गोदावरी डांगे यांचं ‘एक एकर मॉडेल’ उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांत ५०,०००हून अधिक महिला शेतकरी वापरत आहेत. त्याविषयीच्या पुस्तकाची गोष्ट...

२०२०मध्ये कोविड-१९च्या सुरुवातीला लादलेल्या पहिल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान सर्व काही ठप्प झालं होतं. या काळात उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांत महिल्या शेतकऱ्यांसाठी गोदावरीताईंचं ‘एक एकर मॉडेल’ मोठं वरदान ठरलं. त्यामुळे त्यांनी शेतात वेगवेगळी पिकं घेतली आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यशस्वीपणे चालवला. आणि शिल्लक पीक स्थानिक बाजारपेठेत विकून थोडेफार पैसेही कमावले.......